आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मजू द्यावे । पसायदान् हे ।। जे खळांचि व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो । भूता परस्परे पडो । मैत्र जीवांचे ।। दुरितांचे तिमिर् जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील् तो ते लाहो । प्राणिजात् ।। वर्षत् सकळ् मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत् भूमंडळी । भेटतु भूता ।। चला कल्पतरुंचे अरव् । चेतना चिंतामणीचे गाव् । बोलते जे अर्णव् । पीयूषाचे ।। चंद्रमे जे अलांछन् । मार्तंड् जे तापहीन् । ते सर्वांही सदा सज्जन् । सोयरे होतु ।। किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होउनि तिहीं लोकी । भजीजो आदिपुरुखी । अखंडित् ।। येथ् म्हणे श्रीविश्वेधरावो । हा होईल् दान् पसावो । येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ।। - संत ज्ञानेश्वर