श्री आत्मारामाची आरती (नानादेहीं देव एक विराजे)

नानादेहीं देव एक विराजे ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

नानादेहीं देव एक विराजे । नाना नाटकलीला सुंदर रूप साजे । नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे ।। १ ।। जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधिता न कळे गुणसीमा ।। धृ ।। बहुरूपी बहुगुणी बहुतां काळाचा । हरिहर ब्रह्मादिक देव सकळाचा । युगानुयुगीं आत्माराम आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ।। जय ।। २।।