जय देव जय देव जय साईनाथा ।। श्री सदुरुनाथा ।। विश्वंभरा विश्वेशा । तारक तू जगता ।। धृ ।। ब्रह्माणडाचा नायक देवा तू कळले । प्रत्यय निजभक्तांचे अद्भुत दावियेले ।। ब्रह्मा विष्णु शुर गणपती तू त्राता । भजतां तव पदकमला हरिसी भवचिंता ।। १ ।। हरूनि दारिद्र्याते रंका रक्षियले । रोगग्रस्तां तुझिया उदिनें तारियले ।। वांझेसी तोषविलें देऊनिया पुत्रा । जो जो वांछिल त्यांचा तू अससी दाता।।। २।। ज्ञानरवी तू दिधले ज्ञान अज्ञाना । सन्मार्गा लावुनिया उद्धरिले त्यांना ।। ऐशी तू सकलांची ममताळू माता । रोमांचित तनु होई गुण महिमा गातां ।। ३।। यमपाशा तोडुनी तू भक्त सोडविले । आयुर्बल देऊनि त्या सकला तोषविले ।। ऐसे सामर्थ्याचे प्रताप तव गातां । शिणली मति मग आलों शरण तुला नाथा ।। ४ ।। मदृचनी विश्वासुनि जे सेवा करिती । त्यांची चिंता लागे रात्रंदिन मजसी ।। ऐसे दृढ आश्वासन दिधलेसी जगता । करुणेचा सागर तू अससी गुरुनाथा ।। ५।। समतेची योगाची मूर्ती श्री साई । क्रद्चिसिद्धी घेती लोळण तव पार्यी ।। अंतर साक्षी तुजला सर्वांची वार्ता । अगम्य तुजला कांहीं ऐसा तू ज्ञाता ।। ६।। लाभे फळ करितां तव नवस समाधीला । दाखविसी अद्यापी निज साद लीला ।।
चुकतां पथ दर्शविसी देउनि दृष्टांता । हीना दीनांचा तू स्वामी हितकर्ता ।। ७।। जन्मोजन्मी मजला घडु दे श्रीदेवा । आशीर्वचनाची तव लाभो मज सेवा ।। घालुनिया लोटांगण याचितसे नाथा । पापात्मा मी यास्तव लोटुं नका परता ।। ८ ।।
औ सहुरुंची आरती १ सगुण हे आरती निर्गुण ओंवाळूं । कल्पनेचें घृत घालूं दीप पाजळूं ।। १ ।। ओंवाळूं आरती सहुरुनाथा श्रीगुरुनाथा । भावें चरणकमळावरी ठेविला माथा ।। धृ ।। अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडूं । आशा मनशा तृष्णा काम क्रोध कुरवंडू ।। आरती ।। २।। सदुरूचे पूजन केले षोडशोपचारे । रामानंद जीवन्मुक्त झाला संसारी ।। आरती ।। ३।।
औ सहुरुंची आरती २ फळलें भाग्य माझें धन्य झालों संसारी । सुरु भेटला हो तेणें धरियेलें करीं ।। पश्चिमे चालवीलें आत्मस्तुती निर्धारी । त्रिकुटावरी नांद देखियेला पंढरी ।। १।। तें सुख काय सांगूं वाचे बोलता न ये । आरतिचेनि गुणें गेलें मीपण माये ।। धृ ।। राउळामाजीं जातां राहे देह अवस्था । मन हें उन्मन झालें नसे बद्धतेची वार्ता ।। हेतु हा मावळला शब्दा आली नि:ःशब्दता । तटस्थ होऊनि ठेलों नीजरूप पहातां ।। २।। त्रिगुण गुण बाई पूर्ण जळत्या वाती । नवलाव अविनाश न समायें समंज्योती ।। पाहतां लक्ष तेथें हालू विसरली पातीं । नातुडे माझें नाही दिवसराती ।। ३।। आरती सदुरुचि उजळली अंतरीं । प्रकाश थोर झाला सांठवेना अंबरी ।। रविशशि मावळले तया तेजामाझारीं । वाजती दिव्य वाद्यें अनुहाते गजरी ।। ४ ।। आनंदसागरांत प्रेमे दीधली बुडी । लाधलें सौख्य मोठें न ये बोली ।। सदुरुचेनि संगें ऐसी आरती केली । निवृत्तीनें आनंदाची तेथे वृत्ति निमाली ।। ५।।
औ सदुरुंची आरती ३ धन्य धन्य हे प्रदक्षिणा सदुरुरायाची । झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची ।। धृ ।। पदोपदीं अपार झाल्या पुण्याच्या राशी । सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरुनि काशी ।।१।। मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती । नामसंकीर्तनें ब्रह्मानंदें नाचती ।। २।। कोटि ब्रह्महत्या हरती करितां दंडवत । लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत ।। ३।। गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा-निगमांसी । अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी ।। ४ ।। प्रदक्षिणा करूनि देह भावें वाहिला । श्रीरंगात्मज विठ्ठल पुढें उभा राहिला ।। ५।।