आरती भुवनसुंदराची (इंदिरावरा मुकुंदाची)

आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ।। धृ

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ।। धृ पद्यसम पादयुग्मरंगा । ओवाळणी होति भृंगा । नखमणि श्रवताहे गंगा । जे कां त्रिविधतापभंगा ।। फ़चालप्र वर्तुळ गुल्फ भ्राजमाने । किंकिणीक्वणितरु नाद घणघणितरु बांकिवर झुणितरु नेपुरें झनन मंजिरीची । झनन ध्वनी मंजिरीची ।।१ ।। आरती भुवन पीतपट हाटकतप्तवर्णी । कांची नितंबसुस्थानीं । नाभिची अगाध हो करणी । विश्वजनकाची जे जननी ।। फ़चालप्र त्रिवलीललित उदरशोभा । कुंबुगळां माळ विलम्बितरु झळाळ कौस्तुभरु सरळ बाहु श्रिवत्स तरल मणि मरळ कंकणाची । प्रीति बहुरु जडित कंकणाची ।।२।। आरती भुवन इंदुसम आस्य कुंदरदना । अधरारुणार्कबिंबवदना । पाहतां भ्रांति पडे मदना । सजलमेयब्धि दैत्यदमना ।। फ़चालप्र झळकत महरकुंडलाभा । कुटिल कुंतलींरु मयुरपत्रावली वेष्टिलीर तिलक भालिंरु केशरी झळाळित कृष्णकस्तुरीची । अक्षता काळि कस्तुरीची ।। ३।। आरती भुवन कल्पद्रमातळीं मूर्ती । सौदामिनी कोटिदिप्ती । गोपीगोपवलयभंवती । त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ।। फ़चालप्र मंजुळ मधुर मुरलिनदें । चकित गंधर्वरु चकित अप्सरारु सुरागिरिवरारु धरा कर्पुरारतीनें प्रेमयुक्‍त सची ।

आरती ओंवळित साची ।। ४।। आरती भुवन वृंदावनिंचे विहरणि । सखे गे कृष्णमायबहिणी । श्रमलों भवाम्धिचे फिरणीं । आतां मज ठाव देई चरणीं ।। फ़चालप्र अहा हे पूर्ण पुण्यश्लोका । नमितों चरण शरणरु मी करुणा येऊं दे विशालपाणीरु कृष्ण नेणतें बाळ आपुलेंरु राखि लाज याची ।। ५।। आरती भुवन