श्रीशनिदेवाची आरती (जय जय श्रीशनिदेवा)

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।। आरती ओवाळितों । मनोभावें करूनी सेवा ।। धृ।। सूर्यसूता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ।। एक मुखें काय वर्णू । शेषा न चले स्फूर्ती ।। १ ।। नवग्रहामार्जी श्रेष्ठ । पराक्रम थोर तुझा ।। ज्यावरी कृपा करिसी । होय रंकाचा राजा ।। २।। विक्रमासारिखा हो । शककर्ता पुण्यराशी ।। गर्व धरितां शिक्षा केली । बहु छळियलें त्यासी ।। ३।। शंकराच्या वरदानें । गर्व रावणें केला ।। साडेसाती येतां त्यासी । समूळ नाशासी नेला ।। ४।। प्रत्यक्ष गुरुनाथा । चमत्कार दावियेला ।। नेऊनी शूलापाशी । पुन्हा सन्मान केला ।। ५।। ऐसे गुण किती गाऊं । धणी न पुरे गातां ।। कृपा करी दीनावरी । महाराजा समर्था ।। ६।। दोन्ही कर जोडूनियां । रखमां लीन सदा पायीं ।। प्रसाद हाचि मागे । उदयकाळ सौख्य दावीं ।।७॥।