आरती महालक्ष्मीची (जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता)

जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता । प्रसन्न होऊनिया वर देई आता ।। धृ ।। विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता । धन दौलत देई लक्ष्मी्रत करिता ।। १ ।। विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही । धावसी आम्हालागी पावसी लवलाही ।। २।। त्रैलोक्य धारिणी तू भक्‍ता लाभे सुखशांती । सर्व सर्वही दुःख सर्व ती पळती ।।३॥। वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे । देसि दान वरदे सदैव सौख्याचे ।। ४।। यास्तव अगस्ती बन्धु आरती ओवाळी । प्रेमे भक्‍तासवे लोटांगण घाली ।। ५।।