श्रीसंतोषीमातेची आरती (जय देवी श्री देवी संतोषी माते)

जय देवी श्री देवी संतोषी माते ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

जय देवी श्री देवी संतोषी माते । वंदन भावें माझें तव पदकमलातें ।। धृ ।। श्रीलक्ष्मीदेवी तूं श्रीविष्णूपत्नी । पावसी भक्‍्तालागीं अति सोप्या यत्नीं ।। जननी विश्वाची तूं जीवन चिच्छक्ती । शरण तुला मी आलों नुरवी आपत्ती ।। १।। भूगुवारीं श्रद्धेने उपास तव करिती । आंबट कोणी कांहीं अन्न न सेवीती ।। गूळ चण्याचा साधा प्रसाद भक्षीती । मंगल व्हावें म्हणुनि कथा श्रवण करिती ।। २।। जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती । अनन्य भावें तुजला स्मरुनी प्रार्थीती ।। त्याच्या हांकेला तूं धांवुनिया येअसी । संतति वैभव कीर्ती धनदौलत देसी ।। ३।। विश्वाधारे माते प्रसन्न तूं व्हावें । भवभय हरुनी आम्हां सदैव रक्षावे ।। मनींची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी । म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी ।। ४ ।।