स्वस्वरूपोन्मद्बुद्धि वैदेही नेली ।
मागे जास्वस्वरूपोन्मद्बुद्धि वैदेही नेली । देहात्मकाभिमानें दशग्रीवें हरिती । सद्विवेकमारुतिनें तच्छुद्धि आणिली । तव चरणांबुजि येऊनि वार्ता श्रुत केली ।। १ ।। जय देव जय देव जय निजबोधा रामा । परमार्थ आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ।। धृ ।। उत्कट साधुनि शिळा सेतु बान्धोनि । लिंगदेहलंकापुरी विद्ध्वंसोनी । कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभवा रावण निवटोनि ।। जय ।। २ ।। प्रथम सीताशोधी हनुमन्त गेला । लंकादहन करुनी सख्या मारीला । वधिला जंबूमाळी भुवनी त्राहटीला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। जय ।। ३ ।। निजवळें निजशक्ती सोडविली सीता । म्हणुनी येणें झाले अयोध्ये रघुनाथा । आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनि आली कौसल्या माता ।। जय ।। ४ ।। अनुहत वाजिंत्रध्वनि गर्जती अपार । अठरा पद्म वानर करिती भुभु:कार । अयोध्येसी आले दशरथ कुमार । नगरी होत आहे आनंद थोर ।। जय ।। ५ ।।
सहज सिंहासनी राजा रघुवीर । सोहंभावें तया पूजा उपचार । सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदासस्वामी आठव ना विसर ।। जय ।। ६ ।।