श्री रामचंद्रांची आरती ५ (काय करूं गे माय आतां)

काय करूं गे माय आतां कवणा ओवाळूं ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

काय करूं गे माय आतां कवणा ओवाळूं । जिकडे पाहे तिकडे राजाराम कृपाळू ।। धृ ।। ओवाळूं गे माय निजमूर्ति रामा । रामरूपी दुजेपणा न दिसे आम्हा ।। १ ।। सुरवर नर वानर अवघा राम सकल । दैत्य निशाचर तेही राम केवळ ।। २ ।। त्रैलोक्यस्वरूपें राम संचारला एक । सद्गुरुकृपें केशवराजी आनंद देख ।। ३ ।।