ओवाळू ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा । राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ।। धृ ।। कनकाचे पर्येळी उजळोनी आरती । रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ।। ओवाळूं ।। १ ।। मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले । श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ।।। ओवाळूं ।।। २।। वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत । शद्भचक्रगदापद्य आयुधें शोभत ।। ओवाळूं ।। ३।। सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा । चरणीईंचीं नूपुरें वाक्या गाजती नभा ।। ओवाळूं ।। ४ ।। ओवाळीता मन माझें ठाकलें ठायी । समाधिस्थसमान तुकया लागला पायी ।। ओवाळूं ।।५।।