श्री गणेश आरती १ (सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची)

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदूराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।। जय देव जय देव जय मंगल मूर्ती । दर्शनमात्रे मन कामनापूर्ती ।। जय देव रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुम केशरा । हीरे जडित मुकुट शोभतो बरा । रुणुझुणती नूपुरे चरणी घागरिया ।। जय देव लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। जय देव - समर्थ रामदासस्वामी