नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रें ।। ऐसें पूजन केल्या बेएजाक्षर मंत्रें । अष्तहि सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रें ।। १ ।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।। तूझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ।। धृ ।। तुझें ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरति ।। वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ।। जय देव ।।२।। शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं । कीर्ति तयांची राहे जोंवरि शशि-तरणी ।। त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणीं ।। जय देव।। ३।।