कपोल झरती मदें शुण्डा बहु साजे । शेंदूर जो घवघवीत अद्भुत सुविराजे । घागरियांचा घोळ पदी घुळघुळ वाजे । प्रसन्नवदना देवा ध्याना सुख माजे ।।। १।। जय देव जय देव गजनरवेषा । आरती ओवाळू तुजला विश्वेशा ।। धृ ।। विशेष महिमा तुझा नकळे गणनाथा । हरिसी संकट विघ्ने तापत्रयव्यथा । अखण्ड आनंदे तू डोलविसी माथा । ताण्डवनृत्य करिसी तातक् धिम ताथा ।। जय ।। २।। विद्या धनसंपदा कनकाच्या राशी । नारी सुत मंदिरे सर्वहि तू देशी । निर्वाणी पावशी वेगीं भक्तांसी । गोसावीनंदन गातो कवितांशी ।। जय ।। ३ ।।