श्री गणेश आरती ५ (जय देव जय देव जय वक्रतुंडा)

जय देव जय देव जय वक्रतुंडा ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

जय देव जय देव जय वक्रतुंडा । सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ।। जय ।। धृ ।। प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा । उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीला । रुणझुण करिती घागरिया घोळा । सतार सुस्वर गायन शोभित अवलीला ।। जय ।।१।। सारीगमपधनीसप्तस्वरभेदा । धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा । तातक्‌ तातक्‌ थैय्या करिसि आनंदा । ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ।। जय ।। २।। अभयवरदा सुखदा राजिवदलनयना । परशांकुशलडूधर शोभित शुभवदना । ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना । मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करी भ्रमणा ।। जय ।। ३।।