श्री कृष्णाची आरती १ (ओंवाळूं आरती मदनगोपाळा)

ओंवाळूं आरती मदनगोपाळा ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

ओंवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ।। धृ ।। चरणकमल ज्याचे अति सुकुमार । ध्वजब्रजाळुुश ब्रीदाते तोडर ।। १।। नाभिकमलीं ज्याचें ब्रह्मयाचें स्थान । हृदया पदक शोभे श्रीवत्सलांछन ।। २।। मुखकमल पाहातां सूर्याच्याकोटी । मोहियेलें मानस कोंदियली दृष्टी ।। ३ ।। जडितमुगुट ज्याच्या देदीप्यमान । तेणें तेजें कोंदलें अवघे त्रिभुवन ।। ४।। एका जनार्दनीं देखियेले रूप । रूप पाहों जातां झालेसें तद्रूप ।। ५।।