श्री कृष्णाची आरती ५ (ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें)

ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें । सगुणरूप माये माझ्या जीवीं बैसलें । तें मज आवडतें अनुमान न बोले । पाहावया रूप याचें उतावीळ हो झालें ।। १ ।। यालागीं आरती हो कृष्णा पाही हो सखी । आणिक नावडे हो दुजे तिहीं हो लोकीं ।। धृ।। पाऊल कृष्णजीचें माझ्या जीवीं बैसलें । सनकादिक पाहा महा आसक्त झाले । मुक्‍त जो शुकमुनी तेणें मर्नी धरिलें । तें मी केवीं सोडूं मज बहू रुचलें ।। २।। निर्गुण गोष्टि माये मज नावडे साचें । सगुण बोल कांहीं केव्हां आठवी वाचें । पाया लागेन तूझ्या हेंचि आर्त मनींचें । तेणें घडेल दास्य रमावल्लभाचें ।। ३।।