श्रीकृष्णाची आरती ४ (सहरुदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा)

सहरुदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

सहरुदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा । उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ।। १।। कांकड आरति माझ्या कृष्ण सभागिया । चराचर मोहरलें तुझी मूर्ती पहाया ।। धृ ।। कोंदलेंसे तेज प्रभा झालीसे एक । नित्य नवा आनंद ओंवाळितां श्रीमुख ।। २।। आरति करितां तेज प्रकाशलें नयनीं । तेणें तेजे मीनला एका एकीं जनार्दनीं ।। ३।।