श्रीकृष्णाची आरती २ (हरि चला मंदिरा ऐशा म्हणती)

हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका म्हणती राधिका ।

मागे जा
संपूर्ण आरती वाचा

हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका म्हणती राधिका । भावें ओवाळिती यदुकुलतिलका ।। धृ ।। एकीकडे राई एकीकडे रखुमाई । भावे ओवाळिता हरिसी तूं होसी दो ठाई ।। हरि।। १ ।। अष्टाधिक सोळा सहरु ज्याच्या सुंदरा ज्याच्या सुंदरा । जिणे जिणें प्रार्थिलें जासी तियेच्या घरा ।। हरि ।। २।। एका जनार्दनी हरी तूं लाघवी होसी । इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी ।। हरि ।। ३॥।